शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शेततळे खोदताना लागले दहा फुटांवरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:32 PM

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा हे माळरानाच्या कुशीत वसलेले गाव. जेमतेम दीडशे उंबरे अन् ८00 लोकसंख्या. उन्हाळ्यात मात्र कायम टंचाईच्या झळा सोसायचे. टँकर लागले नाही मात्र भटकंती सुरू असायची. कयाधू नदीवरून पूरक योजनेने पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावाला पाणीदार होण्याची आस होती. त्यात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत जलसंधारणासाठी गाव पेटून उठले. येथे गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होत आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून व मशिनच्या साह्याने ही कामे केली जात आहेत.जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही जरोड्या यावर्षीही पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठीची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जरोडा शिवारात शेततळ्याचे काम ९ मे रोजी सुरू केले होते. जेमतेम १० फुटापर्यंत खोदकाम गेले असताना चारही बाजूने झरे फुटले व पाणी एकत्र जमा होऊ लागले. एकीकडे चारशे-पाचशे फूट बोअर घेतल्यानंतरही पाणी लागत नसताना शेततळ्याच्या खोदकामाच्या वेळी मात्र केवळ १० फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळेच पाणीपातळी वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. १० फुटांवर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गाव अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले नसले तरीही नजीकच्या काळात या कामांमुळे नक्कीच पाणीदार म्हणून ओळख मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.ग्रामस्थांनी सलग समतलचर १६ हेक्टर, खोल समतल चर ४0 हेक्टर, बंडिंग ३२, शेततळे १३, मातीनाला बांध १0, सिमेंट नाला बांध ५ व १ केटी वेअर घेतला आहे. यात २२ कोटी लिटर पाणी साठते. स्पर्धेच्या काळात ११ कोटी क्षमतेची कामे झाली. तर पावसासह विविध स्त्रोतांतून १७२ कोटी लिटर पाणी मिळते. तर पिकांसह एकूण गरज १९६ कोटी लिटरची आहे. २३ कोटी लिटरची तूट भरून काढण्यास गाव पुन्हा कामाला लागले आहे.पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांना पाण्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे श्रमदान व यांत्रिकीकरणातून मोठी कामे झाल्याचा फायदा दिसत आहे.- कृष्णराव भिसे, माजी सरपंच, जरोडामी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेवून आल्यानंतर ग्रामस्थांना त्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांनी मनावर घेतले. त्याचा फायदा दिसल्याने यंदा जो-तो स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे.- चांदू भिसे, माजी सरपंच, जरोडा

टॅग्स :Waterपाणी