आरोग्य उपसंचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:22 AM2018-11-30T00:22:08+5:302018-11-30T00:22:25+5:30

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व सहाय्यक संचालक डॉ. एस.व्ही. भटकर औरंगाबाद यांनी २९ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे अचानक भेट देऊन व गोवर रुबेला लसीकरणाची पाहणी केली. जिल्ह्यात या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धी जनजागृतीचा आढावा त्यांनी घेतला.

 Visit to Health Deputy Director | आरोग्य उपसंचालकांची भेट

आरोग्य उपसंचालकांची भेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व सहाय्यक संचालक डॉ. एस.व्ही. भटकर औरंगाबाद यांनी २९ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे अचानक भेट देऊन व गोवर रुबेला लसीकरणाची पाहणी केली. जिल्ह्यात या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धी जनजागृतीचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी समाधानकारक कामे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व सहाय्यक संचालक डॉ. एस. व्ही. भटकर यांनी गावपातळीवर भेटीही दिल्या. त्यांनी गावातील ग्रामस्थांशी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची माहिती याबाबत संवाद साधला. यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल डॉ. संदेश पोहरे, डॉ. नितीन आग्रवाल, ज्योती पवार, सोनवने, कमलेश ईशी, अमोल कुलकर्णी, डी. आर. पारडकर, मुन्नाफ, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला लस देण्यात येत आहे. आतापर्यंत म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३५ हजार २१६ बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. लसीकरण मोहिमेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. खेडोपाडो गावपातळीवर आरोग्य विभागाकडून जनजागृती व प्रचार करण्यात आल्याने या मोहिमेत जनतेचा सहभाग आहे. जिल्ह्यातील संपूर्ण गावात वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सहाय्यक व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आदी परिश्रम घेत आहेत. परभणी, जालना, औरंगाबाद व हिंगोली हे जिल्हे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यांनी हिंगोली येथे भेट देऊन गोवर रूबेला लसीकरण मोहीमेची पाहणी केली. हिंगोली येथील जिल्हा रूग्णालय, जि. प. आरोग्य विभाग तसेच कळमनुरी, असोलवाडी, मसोड यासह विविध गावांना भेट देऊन लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला.

Web Title:  Visit to Health Deputy Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.