VIdeo: नितीन गडकरींच्या सभेत शेतकऱ्याचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात
By विजय पाटील | Updated: February 25, 2023 16:25 IST2023-02-25T16:20:46+5:302023-02-25T16:25:32+5:30
गोंधळ घालत असलेल्या शेतकऱ्यास ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

VIdeo: नितीन गडकरींच्या सभेत शेतकऱ्याचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात
हिंगोली : राष्ट्रीय महामार्ग १६१ च्या चौपदरीकरणात सीमांकनाबाहेरील जमिनी दाखवून काहींना मावेजा दिला तर पोटखराब जमिनी गहाळ करून मावेजा दिला नसल्याचा आरोप करीत वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हिंगोली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत गोंधळ घातला.
हिंगोली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या सभेत शेतकऱ्याचा गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात pic.twitter.com/LqgV2H7aE6
— Lokmat (@lokmat) February 25, 2023
हिंगोलीत २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग लोकार्पणासाठी गडकरी आले होते. त्यांचे आगमन झाल्यानंतर उद्घाटनाच्या वेळी हा शेतकरी उठून उभा राहिला. गोंधळ घालत आपले म्हणने मांडण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासह अन्य शेतकऱ्यांची निवेदने पोलिसांनी ताब्यात घेतली. यात दोन शेतकऱ्यांना खुल्या जागेचा कोट्यवधींचा मावेजा देवून शासनाची फसवणूक केली. मात्र ०.११ आर एवढे पोटखराब क्षेत्र गहाळ करून मावेजा दिला नाही. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करूनही उपयोग झाला नाही. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली आहे. यावेळी गोंधळ घालत असलेल्या नारायण विभुते या शेतकऱ्यास ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.