शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात अस्वच्छता; लक्ष देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

गतिरोधक बसविण्याची मागणी डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रसफाटा येथे मागील काही महिन्यांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली ...

गतिरोधक बसविण्याची मागणी

डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रसफाटा येथे मागील काही महिन्यांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा राज्य रस्ता असल्यामुळे मोठी वाहनेही याच रस्त्यावरून जातात. गतिरोधक नसल्यामुळे लहान मुले तसेच वृद्धांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसत आहे. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन संबंधित विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

‘जड वाहनांना प्रवेश बंदी करावी’

हिंगोली : जड वाहनांना ये-जा करण्यासाठी खटकाळी बायपास करून दिलेला असतानाही काही वाहने शहरातून जात आहेत. यामुळे बहुतांशवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठा अनियमित; शेतकरी त्रस्त

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन आखाडा बाळापूर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी : शहरासह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वेळीच वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वन विभागाचे दुुर्लक्ष

हिंगोली : मागील काही दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरातील शिवाजीनगर, जवाहररोड, शास्त्रीनगर आदी भागात दाखल झाली आहेत. छतावरून उड्या मारत ही वानरे अंगणातील वस्तूंची नासाडी करीत आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही अद्याप वानरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वानरांना पकडून जंगलात नेऊन सोडावे, अशी मागणी होत आहे.