हिंगोलीत हॉटेल मालकाने बालकामगारावर केला अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:31 IST2019-03-20T15:30:57+5:302019-03-20T15:31:48+5:30
याप्रकरणी पिडीत बालकाच्या मातेने गुन्हा दाखल केला आहे

हिंगोलीत हॉटेल मालकाने बालकामगारावर केला अनैसर्गिक अत्याचार
जवळा बाजार (हिंगोली ) : औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या बारा वर्षीय बालकावर हॉटेलमालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडीत बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जवळा बाजार येथील बसस्थानक परिसरात औंढावाले हे खिचडी भजेचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक १२ वर्षीय बालक काम करतो. हॉटेल मालक औंढेवाला मौलाना याने मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याची व्हीडिओ क्लीप करून ती व्हायरल केली. तसेच मुलास थापड बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी पिडीत बालकाची माता यांच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलमालकाविरोधात भादंवि कलम ३७७, ५०६, ३२३ सह कलम ६७ बी आयटी ३, ४, ८, पोक्सो कायदा व १४ (१) बाल कामगार अधिनियम या कलमानुसार आरोपी औढेवाला मौलाना याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करत आहेत. जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी घटनेची नोंद घेतली आहे.