औंढा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 14:35 IST2018-10-08T14:34:34+5:302018-10-08T14:35:06+5:30
दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली.

औंढा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार
औंढा नागनाथ (हिंगोली) : दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. बळीराम देवराव क-हाळे (४०) असे मृताचे नाव असून ते असोलातर्फे लाख येथील रहिवासी होते.
बळीराम क-हाळे आज सकाळी असोलातर्फे लाख येथून औंढा नागनाथ येथे कामानिमित्त दुचाकीवरून प्रवास करत होते. असोलातर्फे लाख मार्गे पिंपळदरी रस्त्यावरून जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. दोन्ही दुचाकींचा वेग जास्त असल्याने बळीराम हे गंभीर जखमी झाले. त्यांना औंढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.