शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कळमनुरीत दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार, तलवारीने जबर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:49 PM

Crime In Hingoli: सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता.  वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले.

कळमनुरी ( हिंगोली ) : येथे सोमवारी रात्री साडे आठ नऊच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून तलवारी व गावठी बंदुकीचा वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाली असून यातील दोघांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

कळमनुरी शहरात सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता.  वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाकडून तलवारीने वार करून गावठी कट्टा ने फायर करण्यात आले. तसेच वाहने अडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात दूध डेरी व कॉम्प्लेक्सची तोडफोड करण्यात आली. एकाच्या घरात घुसून  सामानाची नासधूस करण्यात आली. तर दुसर्‍या गटाकडूनही शिवीगाळ करून दगड, लाठी, रॉड, टोअल बोअर बंदुकीने मारहाण करण्यात आली. दोन्हीं गटाकडून एक ते दीड तास झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. त्यांना उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,  सहायक पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावर,   पोलीस उप निरीक्षक सिद्दिकी आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.  यावेळी शहरातील इंदिरानगर भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.  तसेच ठिकठिकाणी पोलीस नियुक केले आहेत. सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे.

परस्पर विरोधी ५० जणांवर गुन्हा दाखलयावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी ५० जणांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात अब्राज खान अफरोज खान पठाण(रा.पठाण मोहल्ला कळमनुरी) यांच्या फिर्यादीवरून सतनामसिंग हत्यारसिंग टाक, गणेशसिंग हत्यारसिंग टाक, बबलूसिंग हत्यारसिंग टाक, कर्तारसिंग हत्यारसिंग टाक, अजयसिंग हत्यारसिंग टाक, देवासिंग बावरी, जुगनसिंग टाक, राजासिंग देवासिंग टाक, भगतसिंग जुगनसिंग टाक, प्रेमसिंग सतनामसिंग टाक, रामसिंग हत्यारसिंग टाक, गन्यासिंग हत्यारसिंग टाक, जहांगीर टाक, हत्यारसिंगचे तीन जावई व इतर तीन ते चार जणांविरुद्ध( सर्व रा. इंदिरानगर कळमनुरी ) गुन्हा नोंद झाला आहे. तसेच रामसिंग हत्यार सिंग टाक यांच्या फिर्यादीवरून शेख शकील शेख खलील, शाईन मतीन नाईक, अझहर ओयल्यात खान पठाण, खाजा सादुल्ला पठाण, मोईन मतीन नाईक,  शईन मतीन नाईक,  जम्मू शेख खलील,  आरेफ खलील शेख, जमीर खलील शेख, असेफ खलील शेख, टोबो खलीलचा लहान मुलगा, शाहरुख शरीफ शेख, मुजफ्फर सिद्दिकी, ऐहसास उलहक सिद्दिकी, अतिक ओयल्यात पठाण, शाहरूख कुरेशी, सय्यद रफिक सय्यद अली, सलीम सादुल्ला पठाण, साजिद खा सलीम खा पठाण, माजिद खान डिशवाले,  खाजा तज्जू पठाण, जावेद बाबर पठाण, बबलू सत्तार पठाण, चांदपाशा सत्तार शेख, शेख अखिल फावडा, गेंडा महेबूब यांचा मुलगा, सोनू दाऊद चे दोन मुले (सर्व रा. कळमनुरी) याचे विरुद्ध  येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली