आखाडा बाळापुरजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:15 IST2018-10-16T19:14:31+5:302018-10-16T19:15:12+5:30
दोन्ही अपघात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झाले असून यात एक महिला व एक पुरुष यांना प्राण गमवावा लागला.

आखाडा बाळापुरजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
आखाडा बाळापुर (हिंगोली) : शहरालगत दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. दोन्ही अपघात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झाले असून यात एक महिला व एक पुरुष यांना प्राण गमवावा लागला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर येथील विजयमाला कैलास मुधळ या आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान वारंगा फाटा येथील भवानी देवीच्या दर्शनासाठी जात होत्या. या दरम्यान नांदेड- हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर त्यांना ट्रकने चिरडले. गंभारी जखमी झालेल्या विजयमाला यांचा उपचार सुरु असताना नांदेड येथे मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत, नांदेड -हिंगोली रोड वर सोमवारी (दि.१५ ) सायंकाळी पंडित तुकाराम सोळंके (४५ रा. जरोडा ) यांना ट्रकने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या सोळंके यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.