शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

४४० शिक्षकांचा दर्जोन्नतीस होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:02 AM

आरटीईत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, गणित-भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना दर्जोन्नती देणे आवश्यक होते.

ठळक मुद्देहिंगोली शिक्षण विभागदोन दिवस चालली प्रक्रिया

हिंगोली : मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेली विषय शिक्षक समुपदेशन पदस्थापना प्रक्रिया अखेर मंगळवारी पूर्ण झाली. आरटीईत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, गणित-भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना दर्जोन्नती देणे आवश्यक होते. अखेर ४४० शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात आली.२०१४ पासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या जागा भरता येत नव्हत्या. आॅनलाईन बदल्यांमध्ये याच कारणाने अनेक प्राथमिक शिक्षक विस्थापित होऊन विषय शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागेवर रॅन्डम राऊंडद्वारे पदस्थापित झालेले होते. न्यायालयात प्रकरण असल्याने जि.प. हिंगोलीशिक्षण विभागांतर्गत तांत्रिक अडचण निर्माण होवून शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयीन याचिका मागे घेणे व त्यानंतर विषय शिक्षकांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया करणे क्रमप्राप्त होते. ही याचिका करणारे ३२ शिक्षकांना महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने रामदास कावरखे यांनी प्रयत्न केल्याने संबंधितांनी विनाअट काढून घेतली. त्यानंतर विषयावर पदवी असलेलया शिक्षकांचे होकार घेवून सेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या. सदर याद्या प्रकाशित करून १९ व २० नोव्हेंबर रोजी रॅन्डम राऊंडमधील पदस्थापित शिक्षकांना त्यांच्या शाळेवरील रिक्त असलेल्या जागीच होकार असल्यास पदस्थापना देण्यात आली. नकार असल्यास त्यांना अतिरिक्त शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर जाण्यास पात्र ठरवले. त्यानंतर उर्वरित सर्व पदे प्रोजेक्टरद्वारे समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्या. पदस्थापनेमुळे ग्रामीण भागातील शाळेवर पदवीप्राप्त शिक्षकांच्या नेमणुकीमुळे शाळेचा शैक्षणिक स्तर व दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.२३0 जागा रिक्त : आणखी एक टप्पा

  • जिल्ह्यात रिक्त असलेल्या ६७२ पदविधर पदांपैकी ४४० जागा भरल्याने २३० जागा रिक्त आहेत. पुढील टप्प्यामध्ये या जागा भरण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून पूर्ण होईल असे सांगण्यात आले. सदर प्रक्रिया जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण सभापती संजय देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण घुले तसेच संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पार पाडली.
  • जिल्हा परिषदेत काही शिक्षकांनी पदोन्नती तर घेतली. मात्र तरीही नाराजीचा सूर होता. तर काहींना जे झाले ते बरे झाले, असे वाटत होते. नाराजांची पदाधिकाºयांकडे रेलचेल दिसून येत होती.

 

 

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducationशिक्षणTeacherशिक्षक