दोन ठिकाणी तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:19 IST2018-08-18T00:18:42+5:302018-08-18T00:19:00+5:30

कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

 Three lakhs of stolen in two places | दोन ठिकाणी तीन लाखांची चोरी

दोन ठिकाणी तीन लाखांची चोरी

आखाडा बाळापूर/ वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील तातेराव शिवाजीराव तरटे (३४) यांच्या राहते घरी १६ आॅगस्ट रात्री १०.३० ते १७ आॅगस्ट चे १२.३० वाजण्याच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्याचे दागिने व नगदी ७० हजार असा एकूण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गावातीलच नामदेव केशव मगर यांच्या घरी चोरी करणाऱ्यांना पाहिल्याने कल्याण केशव मगर यांच्या तोंडावर विट फेकून मारली व चोरटे पसार झाले. यात कल्याण जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रेडगावकडे वळविला. रेडगाव येथील चुडामण रंगराव पवार (३४) यांच्या राहत्या घरी १७ आॅगस्ट रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे मणिमंगळसूत्राची पोत-२ नग, झुंबर, वेल, फूल, पानाची पोत, नेकलेस, कानातल्या काड्या, गळ्यातले ओम, चांदीचे कमरेच्या साखळ्या, कडे, वाळे, बिंदले असे सोन्या चांदीचे दागिने व रोख ३४ हजार रुपये असा एकूण १.९४ लाखांचा माल चोरुन नेला. आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले.

 

Web Title:  Three lakhs of stolen in two places