पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:19 AM2020-06-08T06:19:22+5:302020-06-08T06:19:47+5:30

पाण्यात उडी मारताच शिवम व रोहीत हे पाण्यात कोठे गेले, पत्ताच लागला नाही़ योगेश हा मला वाचवा, मी बुडत असल्याचे ओरडत होता.

Three friends who went for a swim drowned | पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू

Next

कळमनुरी (जि. हिंगोली) : पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी तिघांचा कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. शिवम सुधीर चौंढेकर (२१), रोहित अनिल चित्तेवार (२२) व योगेश बालाजी गडप्पा (२१) यांचे मृतदेह सापडले आहेत.

पाण्यात उडी मारताच शिवम व रोहीत हे पाण्यात कोठे गेले, पत्ताच लागला नाही़ योगेश हा मला वाचवा, मी बुडत असल्याचे ओरडत होता. त्याला वाचविण्यासाठी श्रीकांत चोंढेकरने प्रयत्न केला. श्रीकांतही बुडत असल्याने त्याला निखिल बोलकेने बाहेर काढले़
त्यानंतर निखिलने तात्काळ गावी मोरगव्हाण येथे फोन लावून माझे मित्र पाण्यात बुडत असल्याचे सांगितले़ तोपर्यंत योगेश गाळात फसल्याने त्याला बाहेर निघता आले नाही़ त्यामुळे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच निखीलचे नातेवाईक घटनास्थळी आले़

Web Title: Three friends who went for a swim drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.