दरवाजा तोडून चोरटे घरात शिरले; चाकूचा धाक दाखवून सव्वादोन लाखांचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 20:05 IST2023-02-14T20:05:20+5:302023-02-14T20:05:24+5:30

शिंदेफळ येथील घटना ; सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

The thieves entered the house by breaking the door; Jewels worth 2.31 lakhs were robbed at knifepoint | दरवाजा तोडून चोरटे घरात शिरले; चाकूचा धाक दाखवून सव्वादोन लाखांचे दागिने लुटले

दरवाजा तोडून चोरटे घरात शिरले; चाकूचा धाक दाखवून सव्वादोन लाखांचे दागिने लुटले

सेनगाव : तालुक्यातील शिंदेफळ येथे चाकूचा धाक दाखवून २ लाख ३१ हजार ९०० रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

शिंदेफळ येथे सुमित्राबाई वसंता डाळ या कुटूंबियांसह राहतात. १३ फेब्रुवारी रात्री घरात सर्वजण झोपले होते. एका खोलीत त्या व नातू, तर दुसऱ्या दोन खोल्यात दोन्ही मुले झोपलेले होते. चोरट्याने घराच्या पाठिमागील दरवाजाची कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुमित्राबाई डाळ यांच्या खोलीत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवित लोखंडी कपाटात ठेवलेले एकूण २ लाख ३१ हजार ९०० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, रणजित भोईटे, पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, पोलिस अंमलदार चव्हाण आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ठसेतज्ञ व श्वान पथक दाखल पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सुमित्राबाई डाळ यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे तपास करीत आहेत.

Web Title: The thieves entered the house by breaking the door; Jewels worth 2.31 lakhs were robbed at knifepoint