पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला 

By विजय पाटील | Updated: July 20, 2023 15:48 IST2023-07-20T15:47:21+5:302023-07-20T15:48:46+5:30

हिवरा (जाटू) शिवारात गावकऱ्यांना मृतदेह आढळून आला.

The body of a farmer who was swept away by the flood waters was found | पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला 

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला 

डिग्रस कऱ्हाळे/येहळेगाव सोळंके (जि. हिंगोली):हिंगोली तालुक्यातील डिग्रस (कऱ्हाळे) व परिसरात मंगळवार व बुधवारी दोन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे डिग्रस गावालगत असलेल्या नदीला पूर आला. या नदीच्या पुरात बुधवारी रात्री एक शेतकरी पुरात वाहून गेला. आज सकाळी त्याचा मृतदेह हिवरा (जाटू) शिवारात आढळला. डिंगाबर सीताराम पारोकर (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हिवरा (जाटू) शिवारात गावकऱ्यांना नदीजवळ शेतकरी पारोकर यांचा मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी हिवरा (जाटू) येथे येऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मगन पवार, बीट जमादार विकी कुंदन व इतर कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a farmer who was swept away by the flood waters was found