आजपासून व्याख्यानमालेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:19 AM2019-01-03T00:19:20+5:302019-01-03T00:19:26+5:30

मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने गेल्या १९ वषार्पासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही व्याख्यानमाला ३ ते ५ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ८ वाजता हिंंगोली येथील ग्यानबाराव सिरसाठ विचारमंच महावीर भवनमध्ये संपन्न होणार आहे.

 Starting from today's lecture | आजपासून व्याख्यानमालेस प्रारंभ

आजपासून व्याख्यानमालेस प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने गेल्या १९ वषार्पासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही व्याख्यानमाला ३ ते ५ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ८ वाजता हिंंगोली येथील ग्यानबाराव सिरसाठ विचारमंच महावीर भवनमध्ये संपन्न होणार आहे.
३ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात ‘स्त्रीमुक्ती; गप्पा की वास्तव?’ या विषयावर प्रसिद्ध विचारवंत लेखिका प्रा. मनीषाताई रिठ्ठे यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई चव्हाण तर उदघाटक वन अधिकारी मनीषा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून कर सहाय्यक अधिकारी कांचन मुटकुळे, अ‍ॅड. सुनीता देशमुख, वर्षा सरनाईक आदींची उपस्थिती राहणार आहे. ४ जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीचा आदर्श व वर्तमान लोकशाहीचा परामर्श या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश प्रवक्ता प्रविण देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे तर उदघाटक कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, वन परिक्षेत्र अधिकारी गणेश झोळे, परभणी तालुका कृषि अधिकारी रामचंद्र तांबीले, बाबाराव श्रृंगारे आदींची उपस्थिती राहणार आहे. ५ जानेवारी रोजी युवा महाराष्ट्र नव महाराष्ट्र या विषयावर लेखक, कवि, स्तंभलेखक ज्ञानेश वाकोडकर नागपूर यांचे मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उदघाटक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मारोतराव बुद्रुक पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title:  Starting from today's lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.