Sri Krishna's Birth Festival in Hingoli | हिंगोलीत श्रीकृष्ण जन्मोत्सव

हिंगोलीत श्रीकृष्ण जन्मोत्सव

हिंगोली : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील राणीसती मंदिरात २४ आॅगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानिमित्त भजन गायक व्यास यांचे संगीतमय भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्म कार्यक्रमानंतर आरती घेण्यात येणार आहे. तसेच छप्पन भोग फळांचा प्रसाद तसेच माखन मिश्री व पंजरीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी रामचंद्र कयाल यांची प्रमुख उपस्थिती असून धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त राणीसती (गंगानगर) मंदिरात सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले.

Web Title:  Sri Krishna's Birth Festival in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.