शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

By प्रसाद आर्वीकर | Updated: February 6, 2025 14:18 IST

शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हिंगोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सेनगाव- रिसोड रस्त्यावर घडली आाहे.

सेनगाव ते रिसोड या रस्त्यावर बुधवारी एक स्कूल बस जात होती. शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कौठा पाटीजवळ या स्कूलबसची आणि दुचाकीची धडक झाली.  या अपघातात जखमी झालेले उत्तमसिंग राजी भगत (६०, रा.कोळसा ता.सेनगाव) यांना तातडीने सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते. मात्र दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरे जखमी शेख आरेफ शेख युसूफ (३८. रा.कोळसा, ता.सेनगाव) हे हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

अपघातातील स्कूल बसही नुकतीच शोरुममधून बाहेर काढण्यात आली असावी. या बसला रजिस्ट्रेशन क्रमांकही नव्हता. ही बस जप्त करुन पोलिस ठाण्यात जमा केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली