शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

टपाल वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; हिंगोलीत २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 3:19 PM

ट्रकचालकाने हा टपाल पार्सल वाहतुकीचा माल असून तो सीलबंद असल्याने सील तोडता येत नाही, अशी बतावणी केली.

ठळक मुद्देसुरुवातीला दहा-वीस कार्टून चप्पल व बुटांचे असल्याचे आढळले.  नंतर संपूर्ण पानमसाला गुटखा आढळून आला.

आडगाव रंजे, जि.हिंगोली : टपाल पार्सलची वाहतूक करीत असल्याची बतावणी करीत १३ लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह २८.७१ लाखांचा मुद्देमाल वसमत तालुक्यातील झीरोफाटा-हट्टा मार्गावर २८ आॅगस्ट रोजी रात्री १०.२० वाजता हट्टा पोलिसांनी जप्त केला. 

परभणी- हिंगोली रस्त्यावरील झिरोफाटा ते हट्टादरम्यान एका महाविद्यालयासमोर रात्री दहाच्या सुमारास हिंगोलीकडे जाणारा सीलबंद कंटेनर गुटखा घेवून जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी थांबवून चौकशी केली.  मात्र ट्रकचालकाने हा टपाल पार्सल वाहतुकीचा माल असून तो सीलबंद असल्याने सील तोडता येत नाही, अशी बतावणी केली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर यात चप्पल, बुट असल्याचे त्याने सांगितले. अखेर पोलिसांनी या वाहनाचे सील तोडले.

महत्वाचे : राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

तेव्हा सुरुवातीला दहा-वीस कार्टून चप्पल व बुटांचे असल्याचे आढळले.  नंतर संपूर्ण पानमसाला गुटखा आढळून आला. यामध्ये राजनिवास पानमसाला गुटख्याच्या अंदाजे ५२ गोण्या आढळल्या असून याची एकूण किंमत १५ लाख १४ हजार होते. तर  प्रीमियम जर्दा तंबाखूचे अंदाजे तेरा पोते एकूण किंमत ३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल आढळून आला आहे.  जप्त केलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची किंमत १८ लाख ७१ हजार आहे. तर दहा लाख रुपये किमतीचे आयशर एमएच ०४ एचवाय - ७९३७  हे वाहनही जप्त केले. असा  एकूण २८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला आहे . 

ही कारवाई सपोनि गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, पोलीस कर्मचारी शेख मदार, श्रीधर शिंदे, प्रवीण चव्हाण यांनी केली. मोरे यांच्या फिर्यादीवरून चालक संजय देवराव मडावी,  कैलास शिवाजी कादबाणे रा. खडद  ता. पुरंदर जि. पुणे व त्याचा मालक याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मडावी व कादबाणे या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस