शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा प्रकरणातील ११ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

हिंगोली : शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील राज्य राखीव दलातील जवानाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकून अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना ...

हिंगोली : शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील राज्य राखीव दलातील जवानाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकून अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना ७ मार्चच्या पहाटे घडली होती. यातील ११ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या घटनेचे स्वरूप लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपवि. पो. अधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि उदय खंडेराय, सहा.पोनिबी आर. बंदखडके यांनी पोउपनि एस. एस. घेवारे, राहुल तायडे, के.डी. पोटे यांची पथके कामाला लावली. घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच हे पथक चितळी, पुतळी, विरेगांव तांडा, पिंप्री डुकरे येथे पोहोचले. पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. काही आरोपी तर नदी, नाल्यातून पळ काढत होते तसेच उसाच्या फडातही लपून बसले होते. मात्र, चितळी पुतळी, बाबई, कवठा गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस पथकाने नदीतून दरोडेखोरांचा पाठलाग करत आराेपीला पकडले. त्यांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, सोन्या-चांदीचे दागिने, ३ एलईडी टी.व्ही, दुचाकी व पीकअप वाहन असा १० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या घटनेतील अन्य एका मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरोडेखोरांकडून अन्य घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पथकात पोलीस कर्मचारी संतोष वाठोरे, भगवान आडे, संभाजी लेकूळे, गजानन पोकळे, अशोक धामणे, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, शेख मोहम्मद , वाढवे, सायबर सेलचे नीलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, सुमित टाले, राहीत मुदीराज, रमा ठोके आदींचा समावेश होता.