शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत एसटीच्या उत्पान्नात साठ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

हिंगोली: उत्पन्नाच्या बाबतीत पुढे असलेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठ्या प्रमाणात फटका बसला असून कोट्यवधींचे उत्पन्न चक्क लाखावर येऊन ...

हिंगोली: उत्पन्नाच्या बाबतीत पुढे असलेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठ्या प्रमाणात फटका बसला असून कोट्यवधींचे उत्पन्न चक्क लाखावर येऊन पोहोचले. कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळाच्या हिंगोली आगारात साठ टक्क्यांनी घट झाली. चाळीस टक्क्यांवरच महामंडळाला समाधान मानावे लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

२०२० मधील मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून कोरोना महामारीने डोके वर काढले होते. मार्च ते जुलै अशी पाच महिने एसटी महामंडळाला चक्क सर्वच बसेस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्यात शेवटी-शेवटी शासनाने माल वाहतुकीसाठी एसटी महामंडळाला परवानगी दिली होती. परंतु, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हिंगोली जिल्हा होऊन आजमितीस २३ वर्षे झाली असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी ही तीनच आगार आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले नसल्यामुळे प्रवासी प्रवास करण्यास मागेपुढे पाहत आहेत.

हिंगोली आगाराला २०१९ मध्ये जानेवारी महिन्यात १ कोटी ४५ लाख, फेब्रुवारी १ कोटी ३५ लाख, मार्च १ कोटी ४८ लाख, एप्रिल १ कोटी ८७ लाख, मे २ कोटी १३ लाख, जून १ कोटी ७६ लाख, जुलै १ कोटी ३८ लाख, ऑगस्ट १ कोटी ४० लाख, सप्टेंबर १ कोटी ३७ लाख, ऑक्टोबर १ कोटी ६० लाख, नोव्हेंबर १ कोटी ६७ लाख, डिसेंबर १ कोटी ४२ लाखांचे उत्पन्न झाले. २०२० मध्ये जानेवारी महिन्यात १ कोटी ३९ लाख, फेब्रुवारी १ कोटी ५६ लाख, मार्च ६ लाख, एप्रिल (निरंक), मे ५ लाख, जून ३ लाख, जुलै २ लाख, ऑगस्ट १५ लाख, सप्टेंबर २६ लाख, ऑक्टोबर ९५ लाख, नोव्हेंबर १ कोटी ५३ लाख आणि डिसेंबर महिन्यात १ कोटी ४१ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. २०२० मध्ये मार्च ते ऑक्टोबर या सात महिन्यात हिंगोली आगाराचे उत्पन्न लाखावर येऊन ठेपले होेते. यामध्ये एप्रिल महिना तर निरंक राहिला गेला.

प्रतिक्रिया

कोरोनाने मागील काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होणे साहजिकच आहे. उत्पन्न वाढीसाठी चालक, वाहक आणि कर्मचारी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली