शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, दवाखान्यात जातोय...मेडिकलला जातोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त ...

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, नागरिक दवाखान्यात जात असल्याचे अथवा औषधी आणण्यासाठी जात असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कारवाई करताना पोलीसही दुहेरी संकटात सापडत आहेत.

हिंगोली शहरात कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना राबवीत असले तरी काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊन रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाने संचारबंदीचे आदेश लागू करून पाहिले. त्यानंतर शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. हिंगोली शहरात शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नागरिक विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर फिरताना दिसून येत आहेत. याबाबत पोलिसांनी कारवाईसाठी थांबविले असता साहेब दवाखान्यात जातोय, औषधी आणण्यासाठी जातोय, रुग्णाचा डबा देऊन आलो, अशी कारणे सांगत आहेत. या कारणामुळे पोलीसही द्विधा मन:स्थितीत सापडत आहेत.

शनिवारी झालेली कारवाई

हिंगोली शहरात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कारवाई करीत आहेत. शनिवारी घराबाहेर पडणाऱ्या २६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रविवारी झालेली कारवाई

हिंगोली शहरात रविवारी ३० नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या पथकानेही शनिवारी, रविवारी असे दोन दिवस ५०० वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंड वसूल केला आहे.

घराबाहेर फिरणाऱ्यांची कारणे सारखीच

हिंगोली शहरात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोलीस कारवाई करीत असले तरी काही नागरिक पोलिसांची नजर चुकवून शहरात फिरत आहेत. पोलिसांनी अडविलेच तर साहेब दवाखान्यात जातोय, औषधी आणण्यासाठी जातोय, अत्यावश्यक सेवेतील वस्तू आणण्यासाठी जातोय, अशी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करताना अडचणी निर्माण होत आहेत.