भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By विजय पाटील | Updated: July 6, 2023 17:39 IST2023-07-06T17:38:17+5:302023-07-06T17:39:56+5:30
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी कुरुंदा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

भेंडेगाव शिवारात रेल्वेपटरीजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
कुरुंदा : वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारातील रेल्वे पटरीजवळ ६ जुलै रोजी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बीट जमादार बालाजी जोगदंड, शंकर भिसे यांनी भेट दिली.
महिला रेल्वेतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह वसमत रुग्णालयात हलविण्यात आला असून मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी कुरुंदा पोलिस प्रयत्न करीत आहेत. सदर महिला जालना येथील असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेतून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. उशिरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.