शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

जिल्हाप्रमुखावरील अ‍ॅट्रॉसिटीच्या निषेधार्थ शिवसेनेचा औंढा, कळमनुरी शहरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:02 PM

शिवसेनेच्या वतीने कळमनुरी, औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

औंढा नागनाथ/कळमनुरी (जि. हिंगोली) : शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यावर मंगळवारी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने औंढा नागनाथ व कळमनुरी शहर बंदचे आवाहन केले होते. गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने कळमनुरी, औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.  व्यापाऱ्यांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. 

औंढा नागनाथ येथे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन दिले तर कळमनुरीत नायब तहसीलदार पी.एम. ऋषी यांना निवेदन देण्यात आले. औंढा नाकनाथ शहरातील डॉ. हेडगेवार चौकामध्ये शिवसैनिक सकाळी ११ वाजता जमले. त्यानंतर बस स्थानक, शासकीय विश्रामगृहामार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर राजकीय द्वेषापोटी दाखल केलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी औंढा शहर कडकडीत बंद ठेवले होते. प्रशासनाने गुन्हा मागे न घेतल्यास शिवसेना जिल्हाभर आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनात दिला आहे. 

तर कळमनुरी येथील सेनेच्या कार्यालयाजवळ शिवसैनिक सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जमा झाले. त्यानंतर पोष्ट आॅफिस रोड ते जुने बसस्थानक व शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयाजवळ निषेध सभाही झाली. येथे अनेकांची मनोगते व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनMorchaमोर्चाTahasildarतहसीलदार