शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

Video: शिवसेना आमदाराच्या वडिलांनी फिरवली तलवार, लेकानेच शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 14:58 IST

आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते

मुंबई - राजकीय नेत्यांच्या घरचा कार्यक्रम किंवा सोहळा म्हटलं की थाटमाट आणि दिमाखदारपणा आला. अतिशय निटनेटकेपणा फाईव्हस्टार चकाकी दिसून येते असते. मात्र, आजही काही आमदार, राजकीय नेत्यांच्या घरचे कार्यक्रम हे रितीरिवाज आणि पारंपरिक पद्धतीनेच चालतात. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुलाच्या लग्नावेळी घरातील कार्यक्रमात पारंपरिक नृत्यावर ठेका धरला होता. आता, हिंगोलीतीलआमदार संतोष बांगर यांच्या वडिलांनी चक्क तलवार फिरवल्याचा व्हिडिओ स्वत: आमदार बांगर यांनीच शेअर केला आहे. 

आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते. औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्शन निर्माण केला. या घटनेची माध्यमांनी दखल घेतल्याने आमदार बांगर चर्चेत आले होते. तर, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादात उडी घेत त्यांनी नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढू, अशी धमकी दिल्यानेही ते अनेकांना परिचीत बनले होते. आता, आमदार बांगर यांनी त्यांच्या 88 वर्षीय वडिलांचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.  माझे वडील लक्ष्मणराव बांगर वय 88 वर्ष, घरातील लग्नात निघालेल्या देवकार्यावेळी परंपरेनुसार तरुणांनाही लाजवेल अश्या स्फूर्तीने तलवार फिरवताना, असे कॅप्शन बांगर यांनी दिले आहे. तसेच, माझे वडील आजही सायकलनेच फिरतात, रोज योग व प्राणायाम करतात. मला माझ्या वडिलांकडूनच 24 तास जनसेवा करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी या व्हिडिओसोबत म्हटले आहे. 

नारायण राणेंबद्दल काय म्हणाले होते

'नारायण राणेंना मला संदेश देयचा आहे. कुठे येयचे कुठे येयचे ते तुम्ही काय सांगता, तुमच्या घरामध्ये एकट्याने घुसून चारीमुंड्या चित्त करेल, पोलीस प्रोटेक्शन बाजूला केले तर कोथळा बाहेर काढण्याची ताकद आमच्यात आहे', असे प्रक्षोभक विधान शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंगळवारी आंदोलनात हिंगोली येथे केले. शिवसेना- भाजप यांच्यातील संघर्षाने राज्यातलं वातावरण चांगलेच तापलेले असताना आमदार बांगर यांनी नारायण राणे ( Narayan Rane ) यांना थेट मारण्याची धमकी होती.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदारHingoliहिंगोली