कळमनुरीत धावती बस उलटून सात विद्यार्थ्यांसह २४ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 10:30 IST2023-01-11T10:30:28+5:302023-01-11T10:30:55+5:30

जखमींमध्ये बस चालकाचा देखील समावेश आहे

Seven students and 24 passengers were injured when a running bus overturned in Kalmanuri | कळमनुरीत धावती बस उलटून सात विद्यार्थ्यांसह २४ प्रवासी जखमी

कळमनुरीत धावती बस उलटून सात विद्यार्थ्यांसह २४ प्रवासी जखमी

कळमनुरी ( हिंगोली): सालवाडी ते कळमनुरी ही एसटी बस आज सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास मसोड गावाजवळ उलटली. यात बस चालकासह 24 जण जखमी झाले आहेत.

कळमनुरी आगाराची बस ( क्रमांक एमएच 20  बीएल 1316 ) आज सकाळी सालवाडीहून कळमनुरीकडे येत होती.  मसोड गावाजवळ ही बस आली असता उजव्या बाजूकडील पाट्याची पिन निघाल्यामुळे ही बस रस्त्यावरून खाली उतरत नाल्यात उलटली. यात बस चालक आणि बसमधील 24 जण जखमी झाले. एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळतात मसोड ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ही माहिती पोलीस ठाण्यात दिली व जखमींना रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी पैकी सात जणांचा एक्स-रे करण्यात आला जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी मध्ये सात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच आगारप्रमुख अभिजीत बोरीकर, सतीश डूरे, अकबर पठाण यांनी भेट दिली.

Web Title: Seven students and 24 passengers were injured when a running bus overturned in Kalmanuri