सेनगावात विज अंगावर कोसळून एकजण ठार तर एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:24 IST2018-06-20T19:24:13+5:302018-06-20T19:24:13+5:30
शेतात काम करत असलेल्या संदीप लांडगे व अमोल घुमनर या दोघांवर विज कोसळली. यात संदीप याचा मृत्यू झाला तर अमोल घुमनर हा गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरु आहेत.

सेनगावात विज अंगावर कोसळून एकजण ठार तर एक गंभीर जखमी
सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील सिनगी खांबा येथे आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतात काम करत असलेल्या संदीप लांडगे व अमोल घुमनर या दोघांवर विज कोसळली. यात संदीप याचा मृत्यू झाला तर अमोल घुमनर हा गंभीर जखमी असून त्यावर उपचार सुरु आहेत.
तालुक्यातील सिनगी खांबा शिवारात डिंगाबर दत्तराव घुमनर यांचे शेत आहे. आह दुपारी घुमनर यांचा मुलगा मुलगा अमोल (१८) व सालगडी संदीप प्रल्हाद लांडगे (२७) हे दोघे शेतातील काम करत होते. याच वेळी अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे ते दोघेही शेतातील वडाच्या झाडाच्या खाली उभे राहिले. या वेळी झाडावर विज कोसळली यात संदीप व अमोल गंभीर जखमी झाले. यानंतर दोघांना उपचारासाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. संदीप याला रुग्णालयात दाखल करताच मृत्यू पावला. तर अमोल यास पुढील उपचारासाठी हिगोली येथे रेफर करण्यात आले आहे.