शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरीतील आरोपींकडून मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सिरसम येथील अंगणवाडी सेविका शारदाबाई विठ्ठल जाधव या ...

बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सिरसम येथील अंगणवाडी सेविका शारदाबाई विठ्ठल जाधव या मुलासोबत दुचाकीवर गावाकडे जात होत्या. त्यांची दुचाकी बासंबा पाटी परिसरात आली असता, दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडवून जबरदस्तीने खाली ओढत नेले. त्यानंतर गळ्यातील सोन्याचे दोन हार, मोबाइल, नगदी रक्कम, बँकेचे पासबुक, असा ८६ हजार ३९९ रुपयांचा ऐवज लांबविला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तात्काळ रवाना केली. बासंबा सपोनि. राजेश मलपिल्लू, स्थागुशाचे उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीणचे बी.आर. बंदखडके यांच्या पथकाने या परिसरात शोध घेऊन त्र्यंबक आनंदराव पवार, आत्माराम लोडबा कोठुळे, वसंता ऊर्फ बंडू रामराव घुगे या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा १ लाख १६ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना मिळणार बक्षीस

महिलेचे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके नियुक्त केली होती. यामध्ये स्थागुशाचे उदय खंडेराय, सपोनि बी.आर. बंदखडके, सपोनि राजेश मलपिलू, पो.उप.नि. सुरेश भोसले, मगन पवार, पोना सतीश शेळके, प्रवीण राठोड, राहुल तडकसे, अश्रुजी काकडे आदींनी तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना बक्षीस देण्याची घोषणा कलासागर यांनी केली.