बरडा पिंप्रीची शाळा भरली जि.प.च्या प्रांगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:33 IST2018-11-27T00:31:49+5:302018-11-27T00:33:06+5:30
सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील दोन शिक्षकांची बदली झाल्याने गावातील पालकांनी थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरविल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली.

बरडा पिंप्रीची शाळा भरली जि.प.च्या प्रांगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील दोन शिक्षकांची बदली झाल्याने गावातील पालकांनी थेट हिंगोली गाठून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची शाळा भरविल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सेनगाव तालुक्यातील बरडा पिंप्री या गावात जिल्हा परिषदेची एक ते पाचपर्यंत वर्गशाळा आहे. जवळपास १०० च्या वर विद्यार्थी या शाळेत शिकतात. येथे तीन शिक्षक कार्यरत होते. यातील दोन शिक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे बरडा पिंप्री येथील शाळेत तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच गावातील पालक वर्ग उपस्थित होते. जोपर्यंत शिक्षक नियुक्त होत नाहीत, तोपर्यंत शाळेत एकही विद्यार्थी पाठविण्यात येणार नाही. असा पावित्रा गावकºयांनी घेतला होता. एक शिक्षक संपूर्ण विद्यार्थ्यांना कसे काय शिकविणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे जि. प. परिसरात काहीवेळ तणावाचे चित्र होते. शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी गावकºयांशी चर्चा केली. तसेच रिक्त जागा प्रक्रियेनुसार भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तर काही पालकांनी परीक्षा काळातच शिक्षकांची बदली झाल्याने रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. तर उपोषणाचा इशाराही दिला. निवेदनावर उद्धव सानप, पंजाब वराड, जनार्दन सानप, अशोक मुंढे, गजानन सानप, सुरेश वाकळे, माधव सानप यांच्यासह गावकºयांच्या स्वाक्षºया आहेत.