शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Hingoli ZP सीईओंच्या दालनासमोर भरली शाळा; विद्यार्थ्यांनी वाचला असुविधेचा पाढा

By विजय पाटील | Updated: December 7, 2022 15:37 IST

शिक्षक दिले अन् परत घेतल्याने विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारात

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथील शाळा व्यवस्थापन समितीने शालेय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मुलांची शाळा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या दालनासमोरच शाळा भरविली.

या शाळेकडे जि.प. व पं.स.च्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष करून आमच्या मुलांचे भवितव्य अंधारात लोटण्याचे काळजीपूर्वक नियोजन केल्याचा आरोप केला. तर २०२०-२१ पासून अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक आहे का? शाळा दुरुस्ती रंगरंगोटी केली का? विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल दिला का? पाठ्यपुस्तकांचे वाटप केले का? ग्रंथालय, प्रयोगशाळा उपलब्धतेच्या नोंदी आहेत का? भाषा, गणित व इंग्रजी पेटी कुलुपबंद आहे त्याची जबाबदारी कोणाची? शाळा व्यवस्थापान समिती, माता पालक संघाच्या बैठका झाल्या का? त्याची नोंदवही आहे का? मुख्याध्यापक बनसोडे रजेवर गेल्यापासून शालेय साहित्य व इतर खर्च कसा भागतो? या काळात नागरिकांना निर्गम उतारा, बोनाफाईड दिला का? अशा प्रकारचे प्रश्न निवेदनात विचारून शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवेदनावर अमोल मोरे, शालिक मोरे, दीपक खनपटे, प्रवीण मोरे, विनोद खराटे, प्रकाश मोरे, देवराव मोरे, संभाजी मोरे, संतोष फड, संतोष चिचे, कानिराम मोरे, दीपक जाधव, मारोती जाधव, रमेश जाधव, रमेश खराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शिक्षक दिले अन् परत घेतलेया ठिकाणी कायमस्वरुपी एकच शिक्षक होता. आता नव्याने दोन शिक्षक देण्याचे आदेश दिले होते. मात्र ते रुजू झाले नाहीत.  त्यांना मूळ शाळेवरच जाण्यास सांगितले. त्यानंतर मोरे नावाचे शिक्षक आले. मात्र त्यांना कोणतेच आदेश नसताना ते रुजू झालेले आहेत. या शाळेतील मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का? या शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तेथे कोणतेच रेकॉर्ड नाही. जोपर्यंत पूर्णवेळ शिक्षक मिळणार नाही. तोपर्यंत मुले येथून उठणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण