जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:58 IST2018-11-03T23:57:47+5:302018-11-03T23:58:01+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी शिवारात शेतामधील एका झाडाखाली बसून तीर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या सात जणांना पोलिसांनी पकडले.

जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी शिवारात शेतामधील एका झाडाखाली बसून तीर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या सात जणांना पोलिसांनी पकडले.
गुरुवारी पोउपनि राजू मोरे यांनी ही धाड टाकून ७ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोउपनि मोरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शे. मुनिर शेख कचरु, देवीदास कोंडबाजी खुडे, महादू मारोती रिठे, प्रकाश यलप्पा पवार, देवराव आहेराजी खिल्लारे, विश्वनाथ महादू डुकरे, कानबाराव श्रीरंग रिठे (सर्व रा. पिंपळदरी) या सात जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून या भागात पोलिसांची मोहीम सुरू असून अवैध व्यवसायांवर कारवाई होत आहे.