हिंगोली : जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी ८ मार्च रोजी काढले आहेत.
यात पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार, तर पाेलीस शिपाई यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीनंतर कर्मचाऱ्यांना ते सध्या जेथे कार्यरत आहेत, त्यांना त्याच ठिकाणी नेमण्यात आले आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षपदी पदोन्नती मिळालेले कर्मचारी पुढीलप्रमाणे कंसात सध्या नेमणूक पोलीस ठाणे- भास्कर केंद्रे (नर्सी ना.), बालाजी मुंढे (एसपीयू), व्यंकट जायभाये (कळमनुरी), आश्रू देवबा डोईजड (श्वान पथक, हिंगोली), बबन गांजरे (जि.वि.शा. हिंगोली), मो. शकील अब्दूल रशीद (पोमु, हिंगाेली), टिकाराम राठोड (कळमनुरी), मारोती चिभडे (हिंगोली ग्रा.), रुस्तुम काळे (पोमु, हिंगोली), उत्तम घोडाम (पोमु), उत्तम वाघमारे (पो.मु.), बजरंग सातव (पोमु) हनुमंत धतुरे (कुरुंदा), चंद्रकांत अवचार (पोमु) यांचा समावेश आहे.
पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळालेले कर्मचारी -अतुल बोरकर (औंढा ना.), राजेश ठाकूर (हट्टा), आंबादास ठाकरे (पोमु, हिंगोली), अविनाश राठोड (वसमत ग्रा.), युवराज वाघमारे (जि.वि.शा.), नंदकुमार सोनवणे (उप.वि.पो.अ. वसमत शहर), प्रभू धुर्वे (वसमत शहर), तुलशीराम वंजारे (सेनगाव), विठ्ठल आम्ले (हिंगोली शहर), विजय चव्हाण (पोमु), नीलेश हलगे (सायबर सेल), रविकांत हरकाळ (हिंगोली ग्रा.), सुनील अंभोरे (स्थागुशा), अस्मिता उदगिरे (हिंगोली शहर), विठ्ठल कोळेकर (स्थागुशा), राजेश शाहू (आखाडा बाळापूर), बशीर चौधरी (कुरुंदा), प्रशांत क्षीरसागर (आखाडा बाळापूर), रवींद्र वरणे (कळमनुरी), गजानन पोकळे (हिंगोली ग्रा.) यांचा समावेश आहे.
पोलीस नाईकपदी पदोन्नती मिळालेले कर्मचारी - अवी कीर्तनकार (एसीबी), तुकाराम केंद्रे (हिंगोली शहर), संदीप चव्हाण (वसमत शहर), गणेश गुंजकर (बासंबा), कुंडलिक अंभोरे (वसमत शहर), गजानन गडदे (कळमनुरी), एकनाथ राठोड (कळमनुरी), गजानन होळकर (हिंगोली शहर), सोपान थिटे (आखाडा बाळापूर), दिनकर बांगर (औंढा ना.), शिवदर्शन खांडेकर (सेनगाव), अनिल वाघमारे (नर्सी ना.), शहाजी बामणीकर (मोपवि), सुनील घुगे (पोमु), माधव बेले (पोमु), बापूराव चव्हाण (औंढा ना.), श्यामराव राठोड (पोमु), स.असिफ अहमद स. अलीम (वसमत शहर), नारायण पोले (पोमु), शे.मोहसीन शे. मैनोद्दीन (पोमु), शे. इरफान शेख खदीर (नाहसं पथक) यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी अभिनंदन केले आहे.
११ महिन्यांची तात्पुरती पदोन्नती
दरम्यान, जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नसल्याने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी नियम व अटीच्या अधीन राहून पोलीस हवालदार सुरेश वाघमारे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच पोलीस नाईक अशोक खंदारे, मपोना सीमा पाटील, नितीन गोरे, लक्ष्मण शेळके यांनाही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय पोलीस शिपाई अमितकुमार जाधव यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नसल्याने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी अटींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.