शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

लोकसंख्येप्रमाणेच वाहनांचाही आकडा फुगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:51 IST

दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे.जिल्ह्यात नोंदणी न केलेली वाहनेही बिनदिक्तपणे धावत आहेत. आरटीओ कार्यालयाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे. त्यामुळे नोंदणीकृत नसलेली वाहने धावण्याचे प्रमाणही वाढत आहे. याकडे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा वाहनचालकांवर कारवाई करणेही तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून अपघाताचा आकडा फुगणार नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार सध्या दुचाकीची संख्या १ लाख २३ हजार ३६० आहे. तर कार आणि जीपची संख्या १२ हजार १८०, आॅटोरिक्षा ३ हजार ८८१, पॅसेंजन वाहने ४१२, मोठे आणि छोटे ट्रक मिळून ७ हजार १५९, रूग्णवाहिका व ट्रक्टरसह इतर वाहनांची संख्या १३ हजार १८१ एकूण १ लाख ६१ हजार ४७२ वाहने जिल्ह्यातील विविध मार्गावरून दररोज धावत आहेत. वाहनांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकीची आहे. दुचाकीनंतर कार आणि जीपचा नंबर लागतो.अपघातात दीड हजार लोकांचा मृत्यू...मागील पाच वर्षांत रस्त्यावरील अपघातामध्ये जवळपास दीड हजार लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही अपघताला एका प्रकारे आमंत्रणच मिळत आहे. हिंगोली आरटीओ कार्यालय नोंदणीकृत वाहना व्यतीरिक्त दररोज जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील पासिंग हजारो वाहने धावतात. जिल्ह्यात मागील दहा वर्षापुर्वी वाहनांची संख्या केवळ ५९ हजार ५७३ होती. आणि आता वाहनांची संख्या दीड लाखाच्यावर पोहचली आहे. म्हणजे दहा वर्षांत वाहनांची दुप्पट संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.फॅन्सी नंबरप्लेटकडे दुर्लक्ष४जिल्ह्यातील विविध मुख्य रस्त्यावरून फॅन्सी नंबरप्लेट असलेली क्रमाकांची वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाच्या नंबरप्लेटवर दादा, मामा, यासह विविध विचित्र प्रकारचे फॅन्सी क्रमांक पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर आरटीओ विभाग कार्यवाही करणार का? असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. शिवाय विनापरवाना वाहन चालविणाºयांची संख्याही लक्षणिय आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRto officeआरटीओ ऑफीस