डोंगरावर सुरु असलेला जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:09 IST2019-01-24T19:52:40+5:302019-01-24T20:09:36+5:30

विशेष पथकाने डोंगरावर जुगार खेळणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे

Police raid on the gambling corner of the hill | डोंगरावर सुरु असलेला जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड 

डोंगरावर सुरु असलेला जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड 

हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी यात्रेत डोंगरावर तितली-भोवरा जुगार खेळ २४ जानेवारी रोजी सुरू होता. विशेष पथकाने डोंगरावर जुगार खेळणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींकडील मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे.  

ग्रामीण भागात सध्या यात्रा महोत्सव सुरू आहे. यात्रेत सर्रासपणे अवैध धंदे चालू आहेत. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी कारवाई केली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे सध्या यात्रा महोत्सव सुरू आहे. डोंगरावर तितली भोवरा नावाचा जुगार खेळ सुरू होता, याबाबत विशेष पथकाला माहिती मिळताच कारवाई केली. यावेळी पोलिसांना पाहाताच काही आरोपींनी धूम ठोकली.

कारवाई दरम्यान जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी ३ हजार २७० रूपये रोकड तसेच ३ हजारांचे साहित्य असा एकूण ६ हजार २७० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विवेक पंपटवार रा. आ. बाळापूर, गजानन रिठ्ठे रा. पिंपळदरी, ईस्माईल सय्यद, संजय महोरे या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती विशेष पथकाचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली.

Web Title: Police raid on the gambling corner of the hill