शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

पीकविमा पोर्टलच अंडर मेंटनन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:25 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ साठी खरिपातील अधिसुचित पिकासाठी आॅनलाईन पद्धतीने विमा उतरविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र सेतू सुविधा केंद्रात ठाण मांडून आहेत. मात्र आॅनलाईन पोर्टलच अंडर मेन्टेनन्स असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्रा बु. : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ साठी खरिपातील अधिसुचित पिकासाठी आॅनलाईन पद्धतीने विमा उतरविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र सेतू सुविधा केंद्रात ठाण मांडून आहेत. मात्र आॅनलाईन पोर्टलच अंडर मेन्टेनन्स असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.पीकविमा भरण्यास बिगर कर्जदारासाठी २४ जुलै तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै अंतिम मुदत आहे. पीक विमा या पोर्टलच्या तांत्रिक कारणामुळे मुदतीपूर्व अर्ज भरण्यासाठी शेतकरी वंचित राहू शकतात. यामुळे शासनाने आॅफलाईन पद्धतीने बँकमार्फत विमा घेण्याची व सेतू सुविधा पार्टल व्यवस्थित करून जुलैची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.खरीप हंगामात पेरणी केलेल्या सर्वच पिकांच्या संरक्षणार्थ पंतप्रधान पीक विमा योजना शासन राबवित आहे. कर्जदार शेतकºयांना त्या बँक शाखेमार्फतच विमा उतरविला जाणार आहे. मात्र बँकेच्या पोर्टलचीसुद्धा हीच अवस्था आहे. पोर्टलवर विमा भरताना सेतूसुविधा केंद्राचे संचालक एका शेतकºयांसाठी तासन्तास बसत आहेत. याबाबत तक्रार तरी करायची कुठे? हा प्रश्न आहे.पार्टलच्या अनेक तांत्रीक अडचणी येत आहेत. कधी पिकविमा हप्त्याची रक्कम कपात होते. मात्र पावती निघत नाही. बरेच वेळा आधार कार्डवरून ओळख पटविण्यासाठी पोर्टलवेळ घेत आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक रात्रंदिवस संगणकासमोर बसले आहेत. पोर्टलच्या बिघाडीचा शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संचालक व शेतकरी यांचा विचार करून प्रशासनाने आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन पद्धतीने विमा हप्ता स्वीकार करून जुलैची तारीख वाढवून देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी