वीज थकबाकी त्वरित भरा; वसुलीसाठी नांदेड, परभणीतील ४० गावे महावितरणच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:28 IST2026-01-02T18:28:20+5:302026-01-02T18:28:25+5:30
महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

वीज थकबाकी त्वरित भरा; वसुलीसाठी नांदेड, परभणीतील ४० गावे महावितरणच्या रडारवर
हिंगोली : सर्वाधिक थकबाकी असलेल्या गावांची यादी महावितरणाने जाहीर केली असून, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील ४० गावांमध्ये सर्वाधिक थकबाकी असल्याने ही गावी महावितरणच्या रडारवर आहेत.
महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. सातत्याने वाढत जाणारी थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता सर्वाधिक थकबाकी असलेल्या गावांना लक्ष्य केले आहे.
नांदेड परिमंडळात दिवाबत्ती, पाणीपुरवठा व कृषी वर्गातील ग्राहक वगळून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि इतर वर्गातील ग्राहकांकडे सुमारे ७५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अनेक गावांमध्ये वीजबिल मोठ्या प्रमाणावर थकले आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीवरील सर्व गावांचे रोहित्रनिहाय नियोजन करण्यात आले असून, व्यक्तिगतरीत्या ग्राहकांकडून वसुली करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाने दिले आहेत.
या गावांमध्ये सर्वाधिक थकबाकी
देगलूर विभाग : भालगाव ३.९१ कोटी, मुक्रमाबाद ३१ लाख, मरखेल १७.६३ लाख, हनेगाव २३.२४ लाख, धर्माबाद १.७१ कोटी, चेनापूर ६२.०३ लाख, मुखेड १.४६ कोटी, बाऱ्हाळी २७.९२ लाख, जांब २२.१६ लाख, नायगाव १.५६ कोटी, नरसी १.३० कोटी, कंधार ६८.३२ लाख, पेठवडज २३.४५ लाख, लोहा १.७२ कोटी, लिंबोटी ३६.३२ लाख, मुदखेड १.३३ कोटी, बारड ५१.४६ लाख, अर्धापूर ७४.२५ लाख, मालेगाव १४.७२ लाख, लहान १५.२३ लाख, भांबरवाडी ७.३९ कोटी, राणीसावरगाव ९५.८६ लाख, अंजनवाडी ता. पालम ३.५० कोटी, तांदूळवाडी १.२१ कोटी, करडगाव ता. परभणी २.२८ कोटी, झरी ५.२४ कोटी, पोखर्णी ५.२५ कोटी, दैठणा ३.४९ कोटी, टाकळी ४.४८ कोटी, पूर्णा ५.९५ कोटी, ताडकळस ४.४ कोटी, जिंतूर १८.५७ कोटी, बोरी ५.५९ कोटी, चारठाणा ४.२ कोटी, मानवत ४.१५ कोटी, पाथरी ९.२५ कोटी, सेलू १०.३२ कोटी, कन्हेरवाडी ९.७९ कोटी, सोनपेठ १.७५ कोटी, शेळगाव ४.८२ कोटी.