ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाची १८ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:32 IST2020-03-09T11:32:00+5:302020-03-09T11:32:54+5:30

याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल

A passenger loses Rs 18 lakh in cash from a travel bus | ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाची १८ लाखांची रोकड लंपास

ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाची १८ लाखांची रोकड लंपास

ठळक मुद्देचिंचाळा शिवारातील एका ढाब्यावर ट्रॅव्हल बस थांबल्यानंतर घटना

हिंगोली : खुराणा ट्रॅव्हल्सने हैदराबादकडे जाणाऱ्या एका प्रवाशाची १८ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जी. श्रीनिवासराव नरसिंगराव (रा. जीयापुरा, बकरीमंडी, हैदराबाद) हे अकोला येथून खुराणा ट्रॅव्हल्सने हैदराबाद येथे जात होते. यावेळी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चिंचाळा शिवारातील एका ढाब्यावर ट्रॅव्हल बस जेवणासाठी उभी करण्यात आली होती. यावेळी जी. श्रीनिवासराव  हेही जेवण करण्यासाठी उतरले होते. दरम्यान, यावेळी पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी त्यांची १८ लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास करून पोबारा केला. काही वेळात आपली बॅग लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यांनी जवळपास शोधाशोध केली. परंतु चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. याप्रकरणी त्यांनी हिंगोली ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती रविकांत हरकळ यांनी दिली.

Web Title: A passenger loses Rs 18 lakh in cash from a travel bus