येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...
शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे. ...
हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे. ...
काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. ...
येथील जिल्हा परिषद कार्यालय प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी हराळ यांच्या अरेरावी व उद्धटपणाच्या कारभाराला कंटाळून माध्यमिक शिक्षक संघाने त्यांचा माध्यमिक आस्थापना पदभार बदलण्याची मागणी १६ सप्टेंबर रोजी संघटनेचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी संदीप सोन ...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेरीट बचाओ देश बचाओ जिल्हा समन्वय समितीच्या वतीने घंटानाद धरणे आंदोलन करण्यात आले. ...
वसमत तालुक्यातील खांबाळा येथे रोजगार हमी योजनेतून विहीर घेण्याचा वाद ग्रामसभेत उफाळल्याने ग्रामस्थांना शिवीगाळ करून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. ...
शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न ...