शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला गती आली आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती झाल्याने स्वत:हून लसीकरणासाठी येत आहेत. मात्र अनेक ठिकाणी लसीचा ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला गती आली आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती झाल्याने स्वत:हून लसीकरणासाठी येत आहेत. मात्र अनेक ठिकाणी लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांत लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ब्रेक बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कळमनुरी तालुक्यात दोन दिवस पुरेल एवढा साठा

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात ८ एप्रिल रोजी लसीकरण सुरू होते. उपजिल्हा रुग्णालयात कोविशील्डच्या ४१० व कोवॅक्सिनच्या १२० लस उपलब्ध होत्या. प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य, व उपकेंद्रावर जिल्हास्तरावरून लसीचा पुरवठा होत असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील उपजिल्हा रुग्णालयाला दर आठवड्याला ४०० च्या जवळपास लस लागतात. तालुक्यातील

डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ एप्रिल रोजी दुपारपर्यंत २३ जणांनी लस घेतली होती. तर प्रा. आ. केंद्रात ८० लस उपलब्ध होती. हिंगोली येथून लस आणण्यासाठी कर्मचारी पाठविल्याचे डॉ. विनोद आतकुरकर यांनी सांगितले आहे. रामेश्वर तांडा येथील आरोग्य केंद्रात आतापर्यंत ५०० जणांनी लस घेतली. तसेच रामेश्वर तांडा आणि कांडली उपकेंद्रात ७ एप्रिल रोजी ८० जणांना लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी दिली. ९ एप्रिलपर्यंत पुरेल एवढा लसीचा साठा उपलब्ध लस आणण्यासाठी रूग्णवाहिका हिंगोली येथे गेल्याचेही डॉ.खान यांनी सांगितले.

शिरडमध्ये मिळेना प्रतिसाद, गिरगावात लसीकरण थांबविले

वसमत शहरात लसीकरण व्यवस्थित सुरू आहे. सध्या तरी तुटवडा जाणवत नसल्याचे चित्र आहे. तसेच कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात कोरोना लसीचे १३० डोस उपलब्ध होते. दररोज ७० ते ८० जण लस घेत आहेत. शिरड शहापूर आरोग्य केंद्रांतर्गत नागेशवाडी उपकेंद्रात गुरूवारी १० जणांनी लस घेतली. शिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात फारसा प्रतिसाद नसल्याने दिवसाआड लसीकरण होत असून केवळ आठ ते दहा जण लस घेत आहेत. आतापर्यंत ८५७ जणांनी लस घेतली असून २०० लसीचा साठा उपलब्ध आहे.

गिरगाव येथे कोरोना रुग्ण वाढत असल्याने लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन ठोके यांनी दिली. कौठा येथील ग्रामस्थांना कुरुंदा येथे जाऊन लस घ्यावी लागत आहे. लवकरच कौठा उपकेंद्रात लसीकरण ठेवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ .सावित्री होळकर यांनी सांगितले.

फाळेगाव येथील लसीचा साठा संपला

हिंगोली तालुक्यातील नर्सी प्रा. आरोग्य केंद्रामध्ये ८ एप्रिल रोजी एकही लसीकरण झाले नाही. इतर सात उपकेंद्रांवर लसीकरण सुरू असून लसीचा दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याचे डॉ.अलोक गट्टू यांनी सांगितले. फाळेगाव आरोग्य केंद्रात पुरेसा लस साठा नसल्याने गुरूवारी लसीकरण होऊ शकले नाही. पुरवठा झाल्यानंतर लसीकरण पूर्ववत होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. तसेच फाळेगाव केंद्रांतर्गत माळहिवरा, आडगाव, माळसेलु, कनेरगाव नाका, अशा चार उपकेंद्रापैकी कनेरगाव नाका उपकेंद्रात अद्याप लसीकरण झालेले नाही. दिग्रस कऱ्हाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दररोज ५० जणांना लस देण्यात येत असल्याचे डॉ. संगीता टारफे यांनी सांगितले.

गोरेगाव येथील आरोग्य केंद्रात अल्प साठा

पुसेगाव आरोग्य उपकेंद्रामध्ये दोन दिवसांत ६१ जणांनी लस घेतली. ८ दिवसांतून दोन दिवस लसीकरण ठेवले जात असल्याची माहिती डॉ. राजेश धामणे यांनी दिली. केंद्र बु , कडोळी येथे लसीकरण केंद्र नसल्याने गोरेगाव आरोग्य केंद्रात जाऊन लस घेत आहेत. केंद्र बु येथे दोन दिवसात लसीकरण सुरू होईल, असे डॉ. मगर यांनी सांगितले. गोरेगाव केंद्रात ८ एप्रिल रोजी केवळ १०० डोस शिल्लक होते. लसीचा पुरवठा न झाल्यास शुक्रवारी तुटवडा जाणवू शक्यतो, अशी माहिती औषध निर्माण अधिकारी सुनील कावरखे यांनी दिली

औंढा तालुक्यात मुबलक लस उपलब्ध

औंढा नागनाथ तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत टप्याटप्याने लसीकरण होत असून ३५० लस शिल्लक आहेत. शिरड शहापूर येथे २००, लोहारा ६०, पिंपळदरी येथे १०० लस उपलब्ध आहेत. नऊ तारखेपासून या ठिकाणी लसीकरणास सुरुवात होणार आहे. मागणी केल्यानंतर लस पुरवठा होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अविनाश गायकवाड यांनी दिली. शहरातील ग्रामीण रुग्णालयात सुटीचा दिवस वगळता दररोज लस दिली जात आहे. जवळा बाजार आरोग्य केंद्रातही लसीचा साठा असून सध्या दररोज ५० जणांचे लसीकरण होत असल्याचे डॉ. गिरीष बल्फेवाड यांनी सांगितले.