शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ ...

हिंगोली : कोरोना बाधितांची संख्या पाहता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तशी कमीच आहे. आजघडीला हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका बाधितामागे २३ अशी आहे. सद्यस्थितीत कोरोनाची संख्या लक्षात घेऊन ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे.

मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण हे एका आकड्यावरून दोन आकड्यांवर येऊन ठेपले आहेत. जिल्हा प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यात तत्पर असले तरी बाधितांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. २३ फेब्रुवारी रोजी ३८ तर २४ फेब्रुवारी रोजी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. सद्यस्थितीत एका बाधितामागे २० ते २५ लोकांना ट्रेस केले जाते. हा आकडा यापुढे जास्तीत जास्त कसा केला जाईल यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आजपर्यंत ८९ हजार ३०५ जण तपासले (ट्रेस) गेले आहेत. यामध्ये तपासणीअंती हायरिक्स २७ हजार ९३० तर लोरिक्स ६१ हजार ४०२ निघाले आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात ते सकाळी सात अशी संचारबंदी लागू केली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण ३ हजार ९८१ आहेत. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ७६४ असून जिल्हा रुग्णालयात आजमितीस १५८ जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ५९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता ट्रेस जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून चालू आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर वेगवेगळी टीम नेमली आहे, अशी माहिती जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. इनायततुल्ला खान यांनी दिली.

नागरिकांना आवाहन करूनही ते काळजी घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालय नागरिकांना काम असल्याशिवाय बाहेर पडू नका, विनामास्क फिरू नका, असे वारंवार सांगत असून तशा सूचनाही देत आहे. परंतु, नागरिक सूचनांकडे कानाडोळा करीत आहेत. परिणामी रुग्ण वाढत आहेत.

-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रतिक्रिया

बाधित झालो तेव्हा बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. घरचेही माझ्यापासून दूरच गेले होते. जेवणही एका वेगळ्या ताटात दिले जात होते. पाण्यासाठी वेगळी बॉटल दिली होती. कोरोनाने एक मात्र चांगले केले ते म्हणजे स्वच्छ राहण्याची शिकवण दिली.

कोरोना बाधित झाला म्हणजे तो दूरचा पाहुणा अशीच त्याची ओळख पटू लागली होती. कोरोना बाधित झाल्याचे कळताच मला अनेकांनी भेटणे तर सोडा साधा मोबाईल करणेही सोडून दिले होते. मी मोठा गुन्हा केला की काय, अशी मानसिकता लोकांमध्ये निर्माण झाली होती.

कोरोना मार्च महिन्यात दाखल झाला. यावेळी गाफील राहिल्यामुळे चौथ्या आठवड्यातच कोरोनाने मला पछाडले. मग काय सर्वत्र मला कोरोना झाला अशी बातमी पसरली. त्यानंतर पंधरा-वीस दिवस तर कोणीच जवळ येत नव्हते. घरचेही दूरच राहिले होते.