हिंगोलीत ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:21 IST2019-04-01T16:21:41+5:302019-04-01T16:21:58+5:30

शहरालगतच्या खटकाळी बायपास भागात नेहमीच अपघात होतात.

One killed in a truck-tractor crash in Hingoli | हिंगोलीत ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार

हिंगोलीत ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार

हिंगोली : हिंगोली शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रकचा आज (दि. १)  दुपारी १२ वाजेच्या सुमारास अपघात होऊन यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शहरालगतच्या खटकाळी बायपास भागात नेहमीच अपघात होतात. आज दुपारी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि टँकर घेऊन जाणारे वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रॅक्टर चालक ट्राली सोडून घटनास्थळावरून पसार झाला. अपघात येवढा मोठा होता की, मयत वाहन चालक ३० ते ४० फुट फरफरठत गेल्याने त्याच्या शरिराचे तुकडे-तुकडे झाले होते.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.  मयताची ओळख अद्याप पटली नसून ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस तातडीने पोहचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर काही वेळात रस्ता मोकळा करून दिला. घटनेची नोंद घेण्याचे प्रक्रिया सुरु आहे. पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांचे पथक करत आहेत.

Web Title: One killed in a truck-tractor crash in Hingoli