ओडिसातील भाविकांची कार कळमनुरीजवळ उलटली; आईसह चिमुरडीचा मृत्यू, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:03 IST2024-12-12T16:02:06+5:302024-12-12T16:03:17+5:30

ओडिसा येथील पाच भाविक देवदर्शनासाठी उज्जैन येथे जात होते.

Odisha devotees' car overturns on Kalmanuri Bypass; Two devotees died, three injured | ओडिसातील भाविकांची कार कळमनुरीजवळ उलटली; आईसह चिमुरडीचा मृत्यू, तिघे जखमी

ओडिसातील भाविकांची कार कळमनुरीजवळ उलटली; आईसह चिमुरडीचा मृत्यू, तिघे जखमी

कळमनुरी (जि. हिंगोली): ओडिसा येथील भाविक देवदर्शनासाठी उज्जैन येथे जात असताना नांदेडहून हिंगोलीकडे जाणारी कार कळमनुरीजवळील बायपासवर उलटली. ही घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आईसह चिमुरडीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ओडिसा येथील पाच भाविक देवदर्शनासाठी उज्जैन येथे जात होते. कळमनुरीजवळ सदर कार (क्रमांक टीएस ०७ जीएक्स ३३८३) अचानक उलटली. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार दिलीप पोले, दादासाहेब कांबळे, जगन पवार आदींनी घटनास्थळी जाऊन जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यातील रनिरा ऋषी कलावटिया (वय सहा महिने), चारूनिधी ऋषी कलावटिया (वय ३४, रा. चावरीया गंज अपर्णानगर कटक ओडिशा) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी असलेल्या ऋषी कलावटीया (वय ३४), दिलीप सिंग (वय ३६), प्रिन्सिसिंग (वय ३२) या तिघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले. कार कशामुळे पलटी झाली याचे कारण मात्र कळू शकले नाही.

Web Title: Odisha devotees' car overturns on Kalmanuri Bypass; Two devotees died, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.