शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असताना मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात किती ...

हिंगोली : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असताना मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे ?, टंचाई जाणवल्यास काय नियोजन करणार ? या प्रश्नाचे दोन्ही पशुसंवर्धन कार्यालयाकडे उत्तर नाही. चारा नियोजनासंदर्भात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र कोरोना रोखण्याच्या धावपळीत मुक्या जनावरांकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात मागील पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने माळरानासह पडीक जमिनीवर चांगले गवत उगवले होते. त्यात जमिनीत ओलावा असल्याने अनेकांनी ज्वारी, मका पिकाची पेरणी केली होती. यातूनही काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला. परंतु, पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे चारा म्हणून वापरले जाणारे कुटार अपेक्षित उपलब्ध झाले नाही. त्यामुळे खरीप हंगामापर्यंत चारा शिल्लक राहणार की नाही, याबाबत ठोस कोणालाही सांगणे आवघड झाले आहे. जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे ? चारा टंचाई जाणवल्यास काय उपाययोजना कराव्या लागणार ? याची जबाबदारी कोणी उचलायची याबाबत जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामध्ये चालढकल सुरू आहे. दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवित आहे. यातून चारा उपलब्धतेचे नियोजनच केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे कामकाजावरही परिणाम होत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. दोन्ही कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपलब्ध होते.

जिल्ह्यातील पशुधन

गाय वर्गीय - २,२९,७५६

म्हैस वर्गीय - ७३,९२०

मेंढ्या - १६,७४२

बकऱ्या - १,४६,७८२

डुकरे - १०४८

चारा नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची आहे. जिल्ह्यातील चाऱ्याची सद्य:स्थिती काय आहे, याची माहितीही त्यांच्याकडेच असते. तरीही चार ते पाच दिवसांत चाऱ्यासंदर्भात आढावा घेऊन माहिती गोळा केली जाईल.

- डॉ. लक्ष्मण पवार, उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय

चारा नियोजनाची जबाबदारी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाची आहे. त्यांच्याकडेच चाऱ्यासंदर्भातील माहिती मिळेल. आगामी काळात चारा टंचाई जाणवू नये, यासाठी मका बियाणे देण्याचे नियोजन आखले आहे.

- डॉ. जावळे, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. हिंगोली