शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

हिंगोली: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यत रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत ...

हिंगोली: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यत रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्या अनुषंगानेच २४ फेब्रुवारीपासून रात्री सात ते सकाळी सात या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेेते यांना सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत मुभा राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, कार्यालये, बँका चालू राहतील. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु, त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. खाजगी रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने रुग्णालयाच्या वेळेनुसार तसेच आपतकालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार दुकान चालू ठेवण्यास मुभा राहील. तसेच पत्रकार, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास याचबरोबर आरोग्य, महावितरण, दूरसंचार, पाणीपुरवठा, स्वच्छता विषयक कामे करण्यास मुभा राहील. पेट्रोल पंप, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, कृषी सेवा, कृषी संबंधित वाहनांना मुभा आहे. या कालावधीत यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी अस्थापना, दुकाने, खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही. संचारबंदीच्या काळात विनामास्क आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मुभा देण्यात आलेल्या व्यक्तींनी मास्क, सामाजिक आंतर यासह शासन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद केले आहे.