सेनगाव तहसीलवर धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यासह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:51 IST2018-08-27T18:50:37+5:302018-08-27T18:51:32+5:30
सकल धनगर समाजाच्या वतीने शेळ्या-मेंढ्यासह ढोल बजाओ मोर्चा काढण्यात आला.

सेनगाव तहसीलवर धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यासह मोर्चा
सेनगाव (हिंगोली) : धनगर समाजाला एसटी प्रर्वगात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने आज दुपारी १ वाजता शेळ्या-मेंढ्यासह ढोल बजाओ मोर्चा काढण्यात आला.
येथील मुख्य रस्त्यावरुन दुपारी एक वाजता मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली असून तातडीने आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कराव बेगाळ, राष्ट्रवादी चे तालुकाअध्यक्ष रवींद्र गडदे, भाजप तालुका अध्यक्ष अशोक ठेंगल, मल्हार संघटना अध्यक्ष गंगाराम फटागळे, निराधार योजना समिती अध्यक्ष पुरुषोत्तम गडदे, अमोल हराळ, बाबाराव शिंदे, दिपक फटागळे,भागोराव पोले, देवराव शिंदे, विकास शिंदे, पंडितराव गडदे, बाळासाहेब गडदे, बाबुराव पोले, सुभाष गडदे, संतोष पोले, बंडू पाटील, कातराव हराळ आदींचा सहभाग होता.