राष्ट्रवादीला (शरद पवार) मोठा धक्का! माजी मंत्र्यांच्या मुलाचा समर्थकांसह भाजपमध्ये 'मेगा' प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:46 IST2026-02-26T15:45:27+5:302026-02-26T15:46:00+5:30

हिंगोली राजकीय भूकंप: आतिष दांडेगावकरांनी सोडली 'तुतारी', समर्थकांसह हाती घेतले 'कमळ'; भाजपची ताकद वाढली

Major Setback for Sharad Pawar NCP in Vasmat: Atish Dandegaonkar Joins BJP with Supporters | राष्ट्रवादीला (शरद पवार) मोठा धक्का! माजी मंत्र्यांच्या मुलाचा समर्थकांसह भाजपमध्ये 'मेगा' प्रवेश

राष्ट्रवादीला (शरद पवार) मोठा धक्का! माजी मंत्र्यांच्या मुलाचा समर्थकांसह भाजपमध्ये 'मेगा' प्रवेश

वसमत (हिंगोली): हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शरद पवार गटाचे खंदे समर्थक आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिष दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील कोकण भवन येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिग्गज नेत्यांची मांदियाळी
आतिष दांडेगावकर यांच्या प्रवेशावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार प्रज्ञाताई सातव, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. केवळ आतिष दांडेगावकरच नव्हे, तर शरद पवार गटाचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 'तुतारीची' साथ सोडून 'कमळ' हाती घेतले आहे.

समर्थकांसह पक्षप्रवेश
यावेळी शरद पवार गटाचे दौलत हुंबाड, शंकर इंगोले, एम. डी. अंभोरे, रमेश सानप, गणेश कमळू, विजय कडतन, चंद्रमुनी मस्के, संजय काकडे, मदन कऱ्हाळे यांच्यासह पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या 'मेगा' भरतीमुळे वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपला मिळणार बळकटी
"आतिष दांडेगावकरांच्या रूपाने भाजपला तालुक्यात एक तरुण आणि सक्षम नेतृत्व मिळाले असून, यामुळे पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळणार आहे," अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. दांडेगावकरांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाची ताकद घटली असून, आगामी निवडणुकीत भाजप या संधीचा कसा फायदा घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : पवार को बड़ा झटका: पूर्व मंत्री के बेटे समर्थकों संग भाजपा में शामिल।

Web Summary : हिंगोली में, शरद पवार के समर्थक और पूर्व मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर के बेटे आतिश दांडेगांवकर प्रमुख नेताओं के साथ भाजपा में शामिल हो गए। इस 'मेगा' प्रवेश, जिसमें पार्षद और ग्राम प्रधान शामिल हैं, से स्थानीय चुनावों से पहले पवार समूह कमजोर हो गया है, वसमत निर्वाचन क्षेत्र में भाजपा मजबूत हो गई है।

Web Title : Big blow to Pawar: Ex-minister's son joins BJP with supporters.

Web Summary : In Hingoli, Sharad Pawar's supporter Atish Dandegaonkar, son of ex-minister Jaiprakash Dandegaonkar, joined BJP with key leaders. This 'mega' entry, including corporators and village heads, weakens Pawar's group before local elections, strengthening BJP in Vasmat constituency.