वसमतमध्ये तोतया पोलिसाने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:52 IST2018-06-11T23:52:18+5:302018-06-11T23:52:18+5:30
येथिल बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तोतया पोलीस बनून दोघांनी लुटण्याची घटना घडली ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलीस असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत अंगठी आणि लॉकेट घेऊन त्याने पळ काढला.

वसमतमध्ये तोतया पोलिसाने लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथिल बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तोतया पोलीस बनून दोघांनी लुटण्याची घटना घडली ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलीस असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत अंगठी आणि लॉकेट घेऊन त्याने पळ काढला.
‘आम्ही पोलीस आहोत चेकिंग सुरू आहे’ असे म्हणत बसस्थानकाजवळ घनश्याम तुकाराम आणेराव (रा.आडगाव, ता. वसमत) या प्रवाशास ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास अडविले. पोलीस चेकिंग सुरू आहे, म्हणत खिशातील पैसे आणि लॉकेट, अंगठी दस्तीत बांधल्याचा बनाव केला. याच दरम्यान शिताफीने अंगठी, लॉकेट काढून घेऊन पैसे तेवढे दस्तीत ठेऊन दस्ती आणेराव यांच्या हातात दिली. थोड्या वेळाने आणेराव यांनी दस्तीत पाहणी केली तर केवळ रक्कमच आढळली. ८0 हजार रुपये किमतीचे दागिने गायब होते. त्यांनी वसमत पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह धुन्ने यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याबाबत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींची आॅपरेंडी लक्षात घेता लवकरच तपास लागेल, असा विश्वास धुन्ने यांनी व्यक्त केला.