शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

खरिपासाठी १.0८ लाख क्विंटल बियाणे हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:59 AM

जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत.हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३.४0 लाख हेक्टर असून यंदा खरिपासाठी ३.५५ लाख हेक्टर प्रस्तावित आहे. यात गतवर्षीएवढे १.0८ लाख क्विंटल बियाणांची महाबीज व खाजगी कंपन्यांकडून मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारी ७५२ क्ंिवटल, बाजरी-२.३, भात-५, मूग-७४८, उडीद-४८५, तूर-३८७७, संकरित कापूस-१0९२, मका-११८, तीळ-५.६, भूईमूग-५, सोयाबीन- १.0३ लाख क्ंिवटल अशी मागणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची मागणी आहे. कपाशीची ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड अपेक्षित असल्याने बीटीची बीजी-१ ची २१ हजार, बीजी-२ ची १.६६ लाख तर नॉन बीटीची ३१ हजार ३८५ पाकिटे मागविण्यात आली आहेत. या तिन्ही प्रकारातील तालुकानिहाय पाकिटांची मागणी औंढा ना.-४0५१0, वसमत-८९७८५, हिंगोली-१३११0, कळमनुरी-५५१९५, सेनगाव-१९८२0 अशी आहे. सार्वजनिक कंपन्यांकडून होणारे उत्पादन कमी असल्याने अवघे ७३४२ क्ंिवटल बियाणे त्यांच्याकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर १.0३ क्ंिवटल बियाणांसाठी खाजगी कंपन्यांवर निर्भर राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्यांचे बियाणे घेताना बिले जपून ठेवत कोणत्याही विशिष्ट वाणाची कास धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. तर कृषी विभागाचा सल्ला घेवून पर्यायी बियाणे निवड करण्यासही सांगण्यात आले. यामुळे शेतकºयांची फसवणूक होणार नाही. विविध कंपन्याद्वारे दरवर्षी अनेक शेतकºयांची फसवणुक होते. योग्य बियाणांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.हंगामापूर्वी कापसाची लागवड करू नका- कृषी अधीक्षक४शेतकºयांनी हंगामपुर्वी कापसाची लागवड करू नये. हंगामपुर्वी लागवड केल्यास कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. कापूस व सोयाबीनमध्ये आंतरपिके घ्यावीत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी केले आहे. खरेदीची पावती कोणी देत नसल्यास संबधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. तसेच दुकानाचा परवानाही निलंबित करण्यात येईल. खरेदीची पावती मिळत नसल्यास शेतकºयांनी तात्काळ कृषि अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शेतकºयांनी बनावट कंपन्याकडून बियाणे तसेच कुठलेही वाण खरेदी करू नये. बोगस कंपन्यांपासून शेतकºयांनी सावधानता बाळगावी. विशेष म्हणजे कापसाच्या बाबतीत शेतकºयांना तणनाशक प्रतिबंधक म्हणून कंपन्याकडून फसवणुक केली जाते. त्यामुळे शेतकºयांनी सावध राहावे.तननाशक प्रतिंबंधक असा प्रचार सध्या विविध कंपन्याकडून सुरू आहे. सदर कंपन्या असे वाण काढण्यात आल्याची खोटी माहिती देत आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनमान्य कंपन्यांचे वाण खरेदी करावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले.महाबीज मार्फत खरीप हंगाम २०१८-१९ साठी सोयाबीन, उडीद पिकांचे प्रमाणित, पायाभूत बियाणे उत्पादनासाठी अग्रीम आरक्षण योजनेत बिजोत्पादक शेतकºयांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती