शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

७४ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

कळमनुरी : यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी आनंदी दिसून येत आहे. यावर्षी ...

कळमनुरी : यावर्षी चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकरी आनंदी दिसून येत आहे.

यावर्षी ७४ हजार ११० हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७४ हजार ११०.८६ हेक्टर आहे. गतवर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे ७४ हजार १९३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षीही हे पेरणी क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे.

तालुक्यात ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८ हजार ५९५ हेक्टर आहे. गतवर्षी १ हजार २७५ म्हणजे १४.८३ हेक्‍टरांवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी हा पेरा पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. मक्याचे सर्वसाधारण परिक्षेत्र ९७.०४ हेक्टर आहे. गतवर्षी ५४० हेक्टरांवर मक्याचे पेरणी झाली होती. यावर्षी मक्‍याच्या पेरणी क्षेत्रात काहीही वाढ होणार नाही. मुगाचे सर्वसाधारण परिक्षेत्र ६ हजार ८२८.७५ हेक्‍टर आहे. या पावसाळ्यात पाऊस लवकर पडल्यास हा पेरा दहा ते पंधरा टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे.

उडदाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २५४७.०६ हेक्टर असून याचा पेरा यावर्षी दहा टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. तालुक्यात तुरीचे ७ हजार १२.३३ सर्वसाधारण पेरणीक्षेत्र आहे. तुरीला बऱ्यापैकी भाव असल्याने तुरीचा पेरा काही टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २६ हजार १३५.८४ हेक्टर आहे. गतवर्षी ५२ हजार ६९५.२० हेक्टरांवर ही टक्केवारी २०१.६२ टक्के आहे. यावर्षी याचा पेरा पाच ते दहा टक्‍क्‍यांनी घटून त्या बदल्यात उसाचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. हळदीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २०१९.६५ हेक्टर असून मागच्या वर्षी ४६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती.

तालुक्यात कापसाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २०८७४.६५ हेक्टर आहे. गतवर्षी ८१४० हेक्टरांवर पेरणी झाली होती. कापसाला हमीभाव नसल्यामुळे व लागवड खर्च जास्त येत असल्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. मागच्यावर्षी सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये गुंतलेला आहे.

यावर्षी लवकरच मान्सून पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षीही खरिपाचे उत्पन्न चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरचे वापरावे या बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.

- गजानंद पवार,तालुका कृषी अधिकारी