अज्ञात वाहनाच्या धडकेने जीप उलटून एक ठार; २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:52 IST2018-09-11T00:52:04+5:302018-09-11T00:52:24+5:30
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. जीप उलटून एक ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्यादरम्यान घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने जीप उलटून एक ठार; २ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडीजवळ अज्ञात वाहनाने जीपला धडक दिली. जीप उलटून एक ठार तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्यादरम्यान घडली.
जीप क्र.एम.एच.३०, एटी ९७७७ ही पातूरहून हैदराबादकडे जात होती. अज्ञात वाहनाने जीपला धडक दिल्याने जीप उलटली. यात जीपचालक दीपक नामदेव आढाव (३०, रा.देवूळगाव ता.पातूर जि.अकोला) हे जागीच ठार झाले. तर जीपमधील प्रमोद मोकडे व सचिन शेंद्रे दोघे रा. मंगरूळपीर हे जखमी झाले.ही माहिती पोलिसांना मिळताच पी.व्ही. इंगोले, एकनाथ राठोड, कांबळे हे घटनास्थळी गेले. रूग्णवाहिकेने मयत व जखमीला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.