शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

५९ हजार कुटुंबांची माहिती आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या निकषपात्र शेतकऱ्यास वार्षिक सहा हजारांची पेन्शन शासन देणार आहे. ती टप्प्या-टप्प्याने देणार असले तरीही त्यासाठीची माहिती आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. महसूल, कृषी व जि.प.च्या यंत्रणेमार्फत हे काम केले जात आहे. आज जिल्हाभर महसूल विभागाने या कामाकडे लक्ष केंद्रित केले होते. मात्र यात कळमनुरी वगळता इतर कोणत्याच तालुक्याला १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. यात माहिती चुकीची झाल्यास अथवा कुणाचे नाव राहिल्यास आक्षेप व हरकती घेण्याचीही मुभा आहे. मात्र आधीच काटेकोर तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्ह्यात नमुना ८ अप्रमाणे खातेदार शेतकरी ३.४३ लाख आहेत. मात्र ७0२ गावांतून परिशिष्ठ अ प्रमाणे अनिवार्य माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संभाव्य संख्या १ लाख ४५ हजार ६९९ आहे. यात सोबतच फेरतपासणीही होत असल्याने कुटुंबसंख्या वाढण्याचीही शक्यता आहे. कळमनुरीत त्यामुळे १८ हजारांवरून २१ हजारांपर्यंत कुटुंबसंख्या गेली. या तालुक्यात १४८ पैकी १३७ गावांचे अपलोडींगचे काम पूर्ण झाले आहे. अजून ११ गावे बाकी आहेत. हा तालुका जिल्ह्यात आघाडी कायम ठेवून असल्याचे दिसत असून काम अंतिम टप्प्यात आहे.श्रेयासाठी धडपडभाजप सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत पेन्शनचा पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यावर टाकून श्रेय घेण्यासाठी अतिशय घाईत हे काम पूर्ण करून घेतले जात आहे. तर आपल्या माहितीत चुका राहू नये म्हणून लोकांची तहसीलपर्यंत गर्दी होत असल्याचे दिसते.हिंगोली तालुक्यात संभाव्य कुटुंबांची संख्या ३0 हजार असून ७0 गावांतील ६७0८ कुटुंबांची माहिती अपलोड झाली. सेनगावात २७ हजार संभाव्य कुटुंबांपैकी ९0 गावांतील ९४0८, वसमतला ५६ हजार संभाव्य कुटुंबांपैकी १0५ गावांतील १२ हजार ९३३, औंढ्यात संभाव्य १३ हजार कुटुंबांपैकी ७६ गावांतील ९0४0 कुटुंबांची माहिती एनआयसीवर अपलोड झालेली आहे. आतापर्यंत ४७८ गावांतील कुटुंबाच्या माहिती अपलोड करण्याचे काम झाले असले तरीही २२४ गावांतील माहिती अपलोड करण्यास प्रारंभही नसल्याचे दिसत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मानचे काम करण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रंदिवस अपलोडिंगचे काम केले जात आहे. वरिष्ठांकडून सकाळपासूनच तगादा होत असल्याने प्रशासन हैराण आहे.

टॅग्स :Familyपरिवारgovernment schemeसरकारी योजना