वसमत तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली, पांग्राशिंदे गावात आवाज, गावकरी आले रस्त्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 23:22 IST2024-03-17T23:21:52+5:302024-03-17T23:22:42+5:30
Hingoli News: वसमत तालुक्यात अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज रात्रीही १०:८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते.

वसमत तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली, पांग्राशिंदे गावात आवाज, गावकरी आले रस्त्यांवर
- इस्माईल जहागिरदार
वसमत - तालुक्यात अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज रात्रीही १०:८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते. काही गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे किती रिश्टरचे हादरे आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही.
पांग्रा शिंदे येथे आवाज येत जमीन हादरली याच प्रकारे गत पाच वर्षा पासुन भुकंपाचे हादरे तालुक्यास बसत आहेत. या धक्कयाची कोठेही नोंद नाही. मात्र भिती व्यक्त केल्या जात आहे. वसमत तालुक्यात गत चार ते पाच वर्षा पासुन भूगर्भातुन आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत,तिन ते चार वेळा भुकंपाची नोंद देखील झाली आहे,१७ मार्च रोजी रात्री १०.८ मि पांग्रा शिंदे व परीसरात भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरली आहे, त्यामुळे गावातील नागरीकांत भीती व्यक्त केल्या जात आहे. यापुर्वीही अनेक वेळा भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना घडल्या आहेत.